महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharastra Politics : राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांचा ठाकरे गटात प्रवेश - माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांचा ठाकरे गटात

वैजापूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( Former NCP MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar ) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 'मातोश्रीवर' ( Matoshree in Mumbai ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश ( Bhausaheb Patil Chichtgaonkar joins Thackeray group ) केला आहे. वैजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेल्यानंतर वैजापूर मतदारसंघातील राजकीय बदल होतील असे सांगण्यात येत होते.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 14, 2022, 4:49 PM IST

औरंगाबाद : काँग्रेस नेत्यांसह त्यांच्या दोन पुतण्यांचा झालेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( Former NCP MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar ) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे चिकटगावकरांनी 'घड्याळाला' सोडचिठ्ठी देऊन ठाकरेसेनेची 'मशाल' हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आज ( 14 डिसेंबर ) मुंबई येथे 'मातोश्रीवर' पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे .

चिकटगावकरांना डावलल्याचा आरोप : काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतणे उल्हास ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे तयारी जून महिन्यापासून सुरू होते. हा प्रवेशसोहळा रोखण्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते मात्र परंतु प्रवेशसोहळा रोखण्यासाठी त्यांना यश आले नाही. गेल्या महिन्यातच चिकटगावकरांना डावलून ठोंबरे काका - पुतण्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई येथे त्यांना प्रवेश देऊन चिकटगावकरांचे खच्चीकरण झाल्याची टीका करण्यात येत होती.

चिगटगावकरांचा यामुळे पक्षप्रवेश : आज झालेल्या ह्या पक्ष पक्षप्रवेशासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही सहमती दर्शविल्याने चिकटगावकरांना पक्षप्रवेश सोपा झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरेसेनेची आघाडी झाली तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही. कारण गेल्या निवडणुकीत ठाकरेसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती. त्यामुळे चिकटगावकरांनी पुढील राजकीय आडाखे बांधून हा प्रवेश करण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. वैजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेल्यानंतर वैजापूर मतदारसंघातील राजकीय पटमांडणीत बदल होतील असे सांगण्यात येत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details