मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परेल गोमातानगर येथे एसआरएचे ५ ते ६ गाळे बळकावल्याची तक्रार केली ( Former Mumbai Mayor Pednekar House Sealed ) आहे. या प्रकरणी सोमय्या यांनी एसआरएकडे तक्रार केली ( Pednekar House Sealed by SRA Municipality ) होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीसाठी आंदोलन केले होते. राज्यात सत्तापरिवर्तन होताच पेडणेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली.
मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांचा एसआरए घोटाळा; पालिकेने केले घर सील? पेडणेकर यांना दादर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी :पेडणेकर यांना दादर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यातही आले होते. याप्रकरणी गंगाराम बोगा यांच्यासह ४ गाळेधारकांना घर भाड्यावर दिल्याने व स्वता वापरात नसल्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी नोटीस बजावली होती. या प्रकरणी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी, असे सहाय्यक निबंधक यांनी म्हटले होते.
मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांचा एसआरए घोटाळा; पालिकेने केले घर सील? हिशोब द्यावाच लागला :उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोमातानगर एसआरएमधील काही गाळे ढापले होते. ते आज एसआरए आणि पालिकेने ते गाळे ताब्यात घेतले आहेत. झोडपट्टीधारकांना हे गाळे वाटप केले जाणार आहेत. किशोरी पेडणेकर यांना हिशोब द्यावाच लागला, अशी तिखट प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांचा एसआरए घोटाळा माझे गाळे सील झालेले नाही :मी भाडेतत्त्वावर राहत होती. माझे कुठचेही गाळे नव्हते व कोठेही माझे गाळे सील झालेले नाही, हे माहीत असूनसुद्धा किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे. गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.