मुंबई - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांची औरंगाबादमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी निवडणुकीच्या तोंडावर मराठे आठवले, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी जेव्हा मराठ्यांची खिल्ली उडवली होती, तेव्हा आदित्य ठाकरेंनी साधी माफी सुद्धा मागितली न्हवती, असेही निलेश राणे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन १४ मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. याच मुद्यावरुन निलेश राणे आक्रमक झाले. निवडणुकीच्या तोंडावरच आदित्य ठाकरेंना मराठ्यांची आठवण होते असे ते म्हणाले.