मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे उपनेते होऊन वर्ष झाले, तरी नेतृत्वाने मला अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही, अशी नाराजी आपल्या राजीनाम्यात व्यक्त करून शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना सुपूर्द केले.
उद्धव ठाकरे यांना पत्र :शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात, मागील महिने सातत्याने वेळ मागूनही उध्दव ठाकरे भेटत नसल्याचा आरोप केला आहे. सर्व प्रयत्न करूनही पक्षाध्यक्षांची भेट होणे, अशक्य झाले होते. यासोबतच त्यांनी आपल्याला आपल्या योग्यतेची काम मिळत नसल्याचेही राजीनामा पत्रात म्हटलं आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मला चार वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, त्यानंतर मला नेता हे शोभेचे पद देण्यात आले, त्यामुळे माझी चार वर्षे वाया गेली.