मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईतील रुग्णाची संख्या पाहता राज्यातील संख्येपेक्षा अधिक असल्याने शहरातील काही ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट असल्याने पालिका व राज्य सरकार अधिक खबरदारी घेत आहेत. यातीलच चेंबूरचा पी. एल. लोखंडे मार्ग असून याठिकाणी दोन चाळीत 9 बाधित रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळी, धारावी व इतर ठिकाणी ज्या प्रकारे यंत्रणा लावली आहे तशीच येथे लावावी, अशी मागणी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे.
'चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर वरळी, धारावीसारखी यंत्रणा राबवली तरच हा भाग वाचेल' - मुंबई कोरोना अपडेट
चेंबूरचा पी. एल. लोखंडे मार्ग असून याठिकाणी दोन चाळीत 9 बाधित रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळी, धारावी व इतर ठिकाणी ज्या प्रकारे यंत्रणा लावली आहे तशीच येथे लावावी, अशी मागणी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे.
मुंबई उपनगरातील चेंबूरचा पी. एल लोखंडे मार्ग हा झोपडपट्टीचा परिसर असून येथे अनेक चिंचोळ्या गल्ली व दाटीवाटीचा भाग असल्याने लोकसंख्या अधिक आहे. या परिसरातील मुकुंद नगर, आणि महात्मा फुले नगर मध्ये मागील काही दिवसांपासून 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कातील 30 लोकांना नुकतेच पालिकेने क्वारंन्टाईनसाठी ताब्यात घेतलेल्या जॉय या खासगी रुग्णालयात भरती केले आहे.
पी. एल. लोखंडे मार्गावर एकच मोठा रस्ता असल्याने नागरिक या रस्त्यावर गर्दी करतात. कारण तीन फुटांच्या छोट्या रस्त्याने शेकडो चाळी वसल्या आहेत. यातील दोन चाळीत कोरोनाचा शिरकाव झाला असून नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. पोलीस नागरिकांना नाकाबंदी करून घरी पाठवत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या व क्वारंटाईन संख्या पाहता वेळीच पालिका व राज्य सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावे अन्यथा हा भाग वाचू शकणार नसल्याची भीती या विभागाचे माजी आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केली आहे.