मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Minister Anil Deshmukh ) यांना शुक्रवारी ( दि. 1 एप्रिल ) मध्यरात्री आर्थर रोड तुरुंगातील बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना शनिवारी ( दि. 2 एप्रिल ) जे जे रुग्णालयात ( J J Hospital ) दाखल करण्यात आले होते. अनिल देशमुख यांच्यावर उपचारानंतर मंगळवारी (दि. 5 एप्रिल) जे जे रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआय ( CBI ) बुधवारी (दि. 6 एप्रिल) घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआय अनिल देशमुख त्यांचा ताबा मिळवण्यासाठी 31 मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाची परवानगी घेतली होती. मात्र, ताबा घेण्यापूर्वी अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सीबीआयने या सर्व प्रकारावर संशय उपस्थित करत न्यायालयासमोर यासंदर्भातील रिपोर्ट सीबीआयला देण्यात यावी, अशी विनंती सीबीआय न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, ही विनंती सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली होती.
या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सीबीआयने 4 एप्रिल रोजी अटक करून ताबा घेतला आहे. तसेच न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी पाठवण्यात याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरून सीबीआय वकिलांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआय उद्या त्यांचा अर्थर रोड जेलमधून ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रिया करण्याची सध्या गरज नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्यांना फिजीओथेरपी घेण्याचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेचा निर्णय 10-12 दिवसांनी घेण्यात येणार आहे. अनिल देशमुखांची सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या अगोदर सीबीआयने सचिन वाझे, संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांची कस्टडी घेतली होती.
हेही वाचा -Rishikesh Deshmukh : ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप निर्णय नाही