महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या माजी महापौरांकडून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्यांना मारहाण - पोलिस वसाहत

माहिम येथील 182 नंबरच्या वॉर्डमधील शिवसेना नगरसेवक मिलींद वैद्य यांनी कोंबड्यांची बेकायदेशीरपणे ने-आण करणाऱ्या टेम्पो चालकांना मारहाण केली आहे.

माजी महापौैर मिलिंद वैद्य कोंबडी विक्रेत्यांना मारहाण करताना

By

Published : Jul 5, 2019, 2:15 PM IST

Updated : Jul 6, 2019, 1:06 PM IST

मुंबई - माजी महापौर व माहीमचे नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्याकडून कोंबड्यांची विक्री करणाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. माहीम येथील मच्छिमार नगर व पोलीस वसाहतीमधील नागरिकांना या कोंबड्यांच्या दुर्गंधी आणि घाणीचा त्रास होत होता. रस्त्याच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या कोंबड्यांच्या गाड्यांबाबत गेली अडीच वर्षे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले म्हणून, कायदा हातात घेतला, असे नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी सांगितले आहे.

माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्याकडून कोंबडी विक्रेत्यांना मारहाण

माहिम येथील 182 नंबरच्या वॉर्डमधील शिवसेना नगरसेवक मिलींद वैद्य यांनी कोंबड्यांची ने आण करणाऱ्या बेकायदेशिर टेम्पो चालकांना मारहाण केली आहे. म्हणून पालिका अधिकारी आणि ट्रॅफीक पोलिसांना वारंवार कळवूनही या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने लोकांच्या भल्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला, असे स्पष्टीकरण मिलींद वैद्य यांनी दिले आहे.

माहिममधील मच्छिमार वसाहत, पोलीस वसाहत येथील रस्त्यांवर 10-12 बेकायदेशीर कोंबड्यांचे गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमध्ये मृतावस्थेतल्या कोंबड्यादेखील असतात. त्यामुळे, आजुबाजूला दूर्गंधी आणि आजार पसरत आहेत. येथील रहिवाशांना त्रास होऊ नये, म्हणून पालिका आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणीही वैद्य यांनी केली आहे.

Last Updated : Jul 6, 2019, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details