महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, जशास तसे उत्तर देऊ' - वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीस यांची टीका

वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'शिवसेनेने भलेही बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातल्या नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, भाजपकडे तेवढी ताकत आहे.'

Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis on Waris Pathan's statement
'शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, आम्ही जशास तसे उत्तर देऊ'

By

Published : Feb 26, 2020, 3:05 AM IST

मुंबई- सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात बोलताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील आयोजित सभेत बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यांनी शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही. आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असे म्हटलं आहे.

वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'शिवसेनेने भलेही बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातल्या नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, भाजपकडे तेवढी ताकत आहे.'

काय आहे वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव्य -

गुलबर्गा येथील आयोजित सभेत बोलताना वारिस पठाण यांनी मुस्लिम समुदायाला स्वातंत्र्य देण्यात आले नाही तर ते त्यांना हिसकावून घ्यावे लागेल, असे सांगितले. तसेच ते म्हणाले की, 'आम्ही आमच्या माता, भगिनींना पुढे करून स्वत: मात्र लपून बसल्याचा दावा काही जण करत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र आता फक्त सिंहीणीच रस्त्यावर उतरल्या असताना तुम्हाला घाम फुटला आहे. कल्पना करा आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो तर काय होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पंधरा कोटी हे शंभर कोटींना भारी पडतील.'

दरम्यान, वारिस पठाण यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. पण आता वारिस यांच्या विषयावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा -

'नारायण राणे कुण्या पक्षात किती काळ टिकतील हे त्यांनी स्वत: तपासून पाहावे'

हेही वाचा -

बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details