महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Team India : वर्ल्ड कपसाठी अजित आगरकरांकडे BCCI देणार मोठी जबाबदारी? - BCCI Chief Selector Vacancy

माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांचे नाव मुख्य निवडकर्त्याच्या पदासाठी चर्चेत आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते पद फेब्रुवारीपासून रिक्त आहे. ही जागा भरण्यासाठी अजित आगरकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सध्या, शिव सुंदरन दास यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. या पदासाठी काही दिवसांपूर्वी वीरेंद्र सेहवाग यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, या सर्व अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 29, 2023, 11:06 PM IST

मुंबई : 2023 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. टीम इंडियाही या विश्वचषकासाठी संघ निवडणार आहे. मात्र, संघ निवडीपूर्वी बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्याचे पद फेब्रुवारीपासून रिक्त आहे. अजित आगरकर या पदसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

बीसीसीआयने मागितले अर्ज : बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर अन्य कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. ही पाच सदस्यीय निवड समिती केवळ चार निवडकर्त्यांसोबत काम करत आहे. ही जागा भरण्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच अर्ज मागवले आहेत.

अगरकरांचे नाव चर्चेत :एका वृत्तसंस्थेने आपल्या एका वृत्तात दावा केला आहे की, मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरांना हे पद मिळण्याची शक्याता आहे. 45 वर्षीय अजित आगरकरांचे नाव दोन वर्षांपूर्वी या पदासाठी चर्चेत होते, परंतु त्यानंतर चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली होती. सध्या अजित आगरकर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणुन काम बघत आहेत.

लवकरच नवीन मुख्य निवडकर्ता नियुक्त :सध्या शिव सुदंर दास हे कार्यवाहक चिफ सिलेक्टरची भूमिका बजावत आहे. पण बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य निवडकर्ता नियुक्त करेल. काही दिवसांपूर्वी वीरेंद्र सेहवाग यांची या पदावर निवड होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र या सर्व अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे होते.

अजित आगरकर आघाडीवर :मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अजित आगरकर हे पुढील मुख्य सिलेक्टर असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. अजित आगरकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, आगरकरांनी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर आयपीएलचे 42 सामने खेळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details