मुंबई -अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) चांदीवाल आयोगाच्या ( Chandiwal Commission) कार्यालयात दाखल झाले आहेत. सचिन वाझेकडून त्यांची उलट तपासणी होणार आहे. या तपासणीत देशमुख यांनी मी सचिन वाझे (Sachin Waze) यांना कधीही भेटलो नाही. मी त्याला ओळखत नाही, त्याचे नावही मला माहित नाही, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले आहे. परमवीर सिंग यांनी लावलेल्या कथित वसुलीच्या आरोपानंतर या आयोगाकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दाखल केलेला अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळून लावला आहे. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मिलिंद भारंबे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवणार आहेत.
सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांची अनिल देशमुख यांच्याशी प्रश्नोत्तरे
अॅड. नायडू - तुम्ही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते का या बाबत ट्वीट केले होते का?
अनिल देशमुख - मी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास झाला असून आता पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. मला अनेक लोक भेटली होती. त्यांनी या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नाही आणि सरकारने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. त्यानंतर मी या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवला.
अॅड. नायडू - या प्रकरणाचा तपास झाला आहे हे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांचे नाव सांगू शकाल का?
अनिल देशमुख- मला आठवत नाही
अॅड. नायडू - याबाबत झालेली चर्चा तुम्ही सांगत असलेल्या गोष्टींची काही नोंद आहे का?
अनिल देशमुख - मला आठवत नाही
अॅड. नायडू - सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात सह-पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली होती?
अनिल देशमुख - मला तारीख लक्षात नाही
अॅड. नायडू - सचिन वाझेच्या नियुक्तीनंतर भारंबे यांची नियुक्ती झाली होती का?
अनिल देशमुख - मला आठवत नाही
अॅड. नायडू - CIU चा प्रभारी सह पोलीस आयुक्तांना अहवाल देत होता का?
अनिल देशमुख - नियमांनुसार त्यांने तसे करायला हवं
अॅड. नायडू - वाझे प्रोटोकॉल फॉलो करत नाहीत त्यांच्या वरिष्ठांना अहवाल देत नाहीत. याबाबत कधी 30 मार्च 2021 च्या आधी मिलिंद भारंबे यांनी तक्रार केली होती का?
अनिल देशमुख - माझ्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार 30 मार्च 2021 पूर्वी आली नव्हती.
अॅड. नायडू - तुम्हाला आठवतंय का तुम्ही ट्वीट आणि स्वत: चा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. ज्यामध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक होते. यामध्ये दिलीप छाब्रिया फेक कॉल सेंटर प्रकरण TRP प्रकरण फेक फॉलोअर्स प्रकरण आदींचा उल्लेख होता.