महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bail denied to Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मनी लाॅंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला ( bail application rejected) आहे.त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Mar 14, 2022, 3:23 PM IST

Updated : Mar 14, 2022, 4:13 PM IST

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर विशेष पीएमएलए न्यायालयाने आज निर्णय देताना त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामिनासाठी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन सेशन कोर्टाने फेटाळला होता. देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. 29 डिसेंबर रोजी ईडीने देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

20 मार्च 2021 ला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (The then Commissioner of Police Parambir Singh) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात 27 जानेवारी रोजी अर्ज करण्यात आला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि दुसरा मुलगा सलील देशमुख यांना न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे. या दोघांना अनेक समन्स बजावूनसुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स दिला.

100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सह आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

Last Updated : Mar 14, 2022, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details