मुंबई -100 कोटी कथित मनी लॉन्ड्रीग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर ऋषिकेश देशमुख यांच्या वतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी युक्तिवाद केला होता. मात्र ईडीकडून तीन तारखा घेऊनसुद्धा युक्तिवाद करण्यात आला नव्हता. आज ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला.
चौकशीला कार्यालयात न जाता अटकपूर्व जामीन अर्ज दाखल : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज मागे घेतला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जावर ईडीच्या वतीने कुठल्याही युक्तिवाद करण्यात आला नसल्याने आज अखेर अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांना केळीच्यावतीने तीन समान पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीला कार्यालयात न जाता अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मग यांच्यावतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी तसेच वकील इंद्रपाल सिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात बाजू मांडली होती. देशमुख यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण होऊन सुद्धा ईडीच्या वतीने तीन वेळा वेगवेगळ्या तारखा घेऊन देखील अद्याप युक्तिवाद करण्यात आला नसल्याने आज अर्ज मागे घेण्यात आला आहे.
प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार: माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात अनेकवेळा जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. परंतु न्यायालयाकडून वारंवार त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हे देखील आरोपीच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. म्हणून ऋषिकेश यांनी त्यापूर्वीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी या प्रकरणात त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र आत्तापर्यंत ते कोणत्याही चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.