मुंबई :माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांचा मोठा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh granted bail) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सलील देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Salil Deshmukh Money Laundering Case) विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर ( Salil Deshmukh Bail Granted) करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सलील आरोपी असल्याचे सांगण्यात आले होते. (Salil Deshmukh ED Action)
सलील 17व्या क्रमांकाचे आरोपी-आज सलील देशमुख कोर्टात हजर झाल्यानंतर समन्स रद्द करत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 88 अंतर्गत सलिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सलीलला 3 लाखांच्या रोख हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सलील हे 17 व्या क्रमांकाचे आरोपी होते.
सलील देशमुख यांचे ईडीला सहकार्य -सलील देशमुख यांच्या वतीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये वकील इंद्रपाल सिंग आणि वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली आहे. सलील देशमुख यांनी ईडीला आतापर्यंत तपासात सहकार्य केले आहे. यानंतर देखील सहकार्य करणार असे आश्वासन कोर्टाला देण्यात आले आहे. त्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी सलील देशमुख यांना काही अटी व शर्तीच्या आधारे जामीन मंजूर केला आहे.
अटी व शर्ती :
1) सलील देशमुख यांना पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश
2) देशाबाहेर कुठेही जाता येणार नाही
3) तपासातील संबंधित कुठल्याही व्यक्तीला तथा साक्षीदारावर दबा न आणण्याचे निर्देश
4) तपास यंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश
काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.