महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक शकील अहमद शेखचा मुंबईत मृत्यू - शकील अहमद शेख

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक लंबू शकीलचा मुंबईमध्ये मृत्य झाला.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम

By

Published : Mar 25, 2019, 11:13 AM IST

Updated : Mar 25, 2019, 12:00 PM IST

मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक शकील अहमद शेखचा मुंबईतील जसलोक रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तो काही दिवसांपासून हृदयरोगाने पीडित होता.

शकील शेखला लंबू शकील म्हणूनही ओळखले जात होते. त्याच्यावर काही दिवसांपासून जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. दाऊदच्या सांगण्यावरून भारतात स्फोटक द्रव्ये आणून स्फोट घडवणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी तो एक होता.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाला दाऊदची डी-कंपनी कंपनी जबाबदार होती. या स्फोटामध्ये जवळपास २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच शेकडो लोक जखमी झाले होते.



Last Updated : Mar 25, 2019, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details