मुंबई :भारताने अमेरिकेपासून सावध राहण्याचा सल्ला माजी लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ( Former Army Chief General Bikram Singh ) यांनी दिला आहे. धोरणात्मक बाबींवर अमेरिकेशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एसबीआय बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह (SBI Banking and Economic Conclave) दरम्यान, जनरल सिंग यांनी सांगितले की, जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेने अद्याप जवळच्या मित्रांबद्दल आपली विश्वासार्हता सिद्ध केलेली नाही. ३१ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत सेवा बजावलेले २४ वे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी अमेरिकेशी धोरणात्मक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्पष्ट केले आहे. अमेरिका आपल्या सर्व बाह्य लष्करी हस्तक्षेपांमध्ये अपयशी ठरली आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आपले काम इतरांना आउटसोर्स करत आहे, असेही सिंग म्हणाले.
अमेरिकेने कधीच संरक्षण मित्र देशांवर विश्वास ठेवला नाही ?सिंग पुढे म्हणाले की, भारत क्वाड ग्रुपिंगचा सदस्य असूनही अमेरिकेने सावधगिरी बाळगली पाहिजे. अमेरिकेने गेल्या काही वर्षांत भारतासोबतचे संबंध दृढ केले आहेत. तरीही अमेरिकेबरोबर सावधगिरीने पुढे जा, कारण अमेरिकेने कधीच सामरिक आणि संरक्षण मित्रांसोबत स्वत:ला विश्वासार्ह बनवले नाही. अमेरिका त्याच्या सर्व बाह्य लष्करी हस्तक्षेपांमध्ये अयशस्वी होत आहे, असेही सिंग म्हणाले.