मुंबई- "एकच लक्ष तेहत्तीस कोटी वृक्ष" ही योजना राबवून राज्य हिरवेगार आणि निसर्ग संपन्न करण्याचे उद्दिष्ट राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवले होते. त्यानुसार त्यांनी योजनाही राबविली होती. मात्र, विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी यांना दिले आहे.
राज्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी वृक्ष लागवड योजना राबविली होती. मात्र, राज्यातील काही ठिकाणी या वृक्ष लागवडीत अनियमितता झाल्याच्या काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या मतदारसंघात झालेल्या वृक्ष लागवडीत मोठी अनियमितता झाल्याची तक्रार वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती.