महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला अंमली पदार्थ तस्कराला अटक - मुंबई क्राईम न्यूज

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथे राहणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना ती ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ती चेकावू मका नावाच्या अंमली पदार्थ तस्कराच्या संपर्कात होती. एअर इंटेलिजेन्स चौकशीत जेन म्हणाली की, तिच्याजवळ सापडलेले हेरॉईन तिला चेकावू याने दिले होते. ती दिल्लीहून मुंबईत आली होती. नालासोपाऱ्यात हे अंमली पदार्थ विकल्यानंतर ती दिल्लीला परतणार होती.

एअर इंटेलिजेन्स युनिट मुंबई न्यूज
एअर इंटेलिजेन्स युनिट मुंबई न्यूज

By

Published : Dec 22, 2020, 12:23 PM IST

Updated : Dec 22, 2020, 12:43 PM IST

मुंबई -एअर इंटेलिजेन्स युनिटने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला तस्कराला अंमली पदार्थासह अटक केली आहे. ती युगांडाची रहिवासी आहे. तिच्याकडून अडीच कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरअडीच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

अडीच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

एअर इंटेलिजेन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयित परदेशी महिलेला अटक केली. जेन नालो मानशी उर्फ ​​मबाबाझी ओलिव्हर जोसलीन (वय 31, वय रा. युगांडा) असे तिचे नाव आहे. एअर इंटेलिजेन्स युनिटने जेनचे सँडल स्कॅन केले, तेव्हा तिला आढळले की, तिने तिच्या सँडलमध्ये 501 ग्रॅम हेरॉईन लपवून ठेवले होते, ज्याचे मूल्य अडीच कोटी रुपये आहे. तिला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी आणखी एकाला अटक; २५ लाखांची रोकड जप्त

एअर इंटेलिजेन्स युनिटच्या चौकशीत माहिती उघड

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथे राहणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना ती ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ती चेकावू मका नावाच्या अंमली पदार्थ तस्कराच्या संपर्कात होती. एअर इंटेलिजेन्स चौकशीत जेन म्हणाली की, तिच्याजवळ सापडलेले हेरॉईन तिला चेकावू याने दिले होते. ती दिल्लीहून मुंबईत आली होती. नालासोपाऱ्यात हे अंमली पदार्थ विकल्यानंतर ती दिल्लीला परतणार होती. तिला तस्करीसाठी विमानाचे तिकीट आणि कमिशन देखील देण्यात आले. जेन पर्यटक व्हिसावर मुंबईला पोचली आणि विमानतळावर तिच्या सहकाऱ्यांचा शोध घेत होती.

हेही वाचा -आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी माझी इच्छा - फडणवीस

Last Updated : Dec 22, 2020, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details