नवी मुंबई : सोशल मीडियाच्या काळात अनेक जण आभासी जगात जगत आहेत. त्यातच डेटिंग ॲप सारख्या गोष्टी फोफावत असल्याने अनेकांची फसवणूक होत आहे. अशीच फसवणूक नवी मुंबईतील खारघर येथील एका तरुणाची झाली आहे. डेटिंग ॲपवरील एका विदेशी महिलेने (foreign woman cheated young man) तरुणाला अल्पकाळातील दामदुप्पट योजनेचे आमिष (luring doubling money) दाखवून त्याला कोट्यावधीचा गंडा (Young Man crores looted in Mumbai) या एका महिलेने घातला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला परदेशी आहे त्यामुळे तिला ताब्यात घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत. Latest news from Mumbai, Mumbai crime
डेटिंग ॲप द्वारे झाली ओळख: आपला वेळ जावा म्हणून खारघर मधील एका 38 वर्षीय तरुणाने डेटिंग ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केले. त्यातच त्याची ओळख एका फिलिपिन्स देशातील परदेशी महिलेची झाली ओळखीतून महिलेने पैसे डबल करण्याचा मार्ग तरुणाला दाखवला.
तरुणाचा विश्वास संपादन करून अखेर केली फसवणूक: क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे दुप्पट करून मिळतील असे संबंधित परदेशी महिलेने तरुणाला भुरळ घातली. सुरुवातीला तरुणीने तरुणाला लाखो रुपये गुंतवणूक करून दुप्पट पैसे दिले. असे अनेक वेळा झाले त्या महिलेने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तरुणाला त्या परदेशी महिलेने एक कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले अनेक वेळा पैसे परत मिळाल्याने तरुणाचा महिलेवर विश्वास होता, त्याने तरुणीचे ऐकून एक कोटी रुपये गुंतवले. मात्र त्याला अनेक दिवस झाले पैसे परत मिळाले नाहीत, या संदर्भात तरुणाने महिलेला विचारणा केली. मात्र आणखी पैसे टाकावे लागतील असे महिलेने तरुणाला सांगितले. त्यामुळे तरुणाने 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर पीडित तरुणाने महिलेला पैसे दुप्पट होण्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी महिलेने पैसे दुप्पट झाल्याचे तरुणाला सांगितले. त्यानंतर तरुणाने बँक गाठली, त्यानंतर त्याला कळाले खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही. त्याने त्या महिलेला फोन लावण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन बंद आल्याने त्याचा संशय आणखीच बळावला. त्यामुळे तरुणाने सायबर सेलला फोन केला व त्या संदर्भात माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली व संबंधित महिलेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.
महिलेला ताब्यात घेण्यात अनेक अडचणी:पीडित तरुणाची फसवणूक केलेली महिला ही परदेशी असल्याने व तिचे बँक अकाउंट देखील परदेशी असल्याने नवी मुंबई पोलिसांपुढे संबंधित महिलेला ताब्यात घेणे मोठे आव्हान बनले आहे. एका डेटिंगॲपमुळे तरुणाला कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला गेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे डेटिंग ॲप डाऊनलोड न करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.