मुंबई -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांना एकूण 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींची मानके व बाबी नुसार करावयाचा खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, औरंगाबाद व पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेत राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना रुपये 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.