मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे गरिबांची परवड होत आहे. रस्त्यावर राहणारे नागरिक आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यांना मदत म्हणून काही सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. नाना पालकर स्मृती समिती आणि गौरीशंकर मिठाईवाले यांच्यावतीने वाडिया रुग्णालय आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात असलेले रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देण्यात आले.
गरीब रुग्णांना लॉकडाऊन असेपर्यंत देणार जेवण; सामाजिक संस्थांनी दिला मदतीचा हात - लॉकडाऊन
लॉकडाऊनमुळे मुंबईमध्येच अडकलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाना पालकर स्मृती समिती आणि गौरीशंकर मिठाईवाले यांच्यावतीने जेवण देण्यात आले. हे कार्य लॉक डाऊन असेपर्यंत सुरू राहणार, असे समितीकडून सांगण्यात आले.
सामाजिक संस्थांनी दिला मदतीचा हात
मुंबईत उपचार घेण्यासाठी देशभरातून नागरिक येतात. काही वेळा तर महिना-महिना या नागरिकांना मुंबईतच रहावे लागते. अशा लोकांना आता लॉकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाही. अशा व्यक्तींना नाना पालकर स्मृती समिती आणि काही उद्योजकांच्या मदतीने जेवणाचे वाटप करत आहोत. हे कार्य लॉक डाऊन असेपर्यंत सुरू राहणार, असे समितीकडून सांगण्यात आले.