मुंबई : राज्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. परंतु, '२१ तारखेनंतर (एप्रिल) रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल व २५ तारखेपर्यंत जवळपास ७० ते ७५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतील. तर येत्या दहा दिवसांत दररोज १ लाख रेमीडिसिवरचा पुरवठा उपलब्ध होईल', अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
महाराष्ट्राला लवकरच रोज १ लाख रेमडेसिवीरचा पुरवठा होईल - राजेंद्र शिंगणे - Maharashtra remdesivir news
महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, २१ तारखेनंतर (एप्रिल) रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल व २५ तारखेपर्यंत जवळपास ७० ते ७५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतील. तर येत्या दहा दिवसांत दररोज १ लाख रेमीडिसिवरचा पुरवठा उपलब्ध होईल', अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्य आरोग्य विभागाशी निगडीत यंत्रणांची बैठक बोलावली होती.
‘यावेळी सिपला, झायडेक अशा एकूण सात कंपन्यांशी चर्चा केली. देशभरासह महाराष्ट्रात पुरवठा कसा सुरळीत होईल? याबाबत विचारणा करण्यात आली. दरम्यान, कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून येत्या २५ तारखेपर्यंत ७० ते ७५ हजार कुप्या मिळतील. तर १ मे पर्यंत हा आकडा १ लाखपर्यंत जाईल’, असे शिंगणे यांनी सांगितले.