मुंबई -कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार, कोयनेतून ५३ हजार ८८२, तर राधानगरी धरणातून ४ हजार २५६ क्युसेकने विसर्ग सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आत्तापर्यंत कोल्हापूरमधील शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर केले असून, अद्यापही महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अलमट्टी, राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हळूहळू पूर ओसरत आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे. आज पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ५० फुट ११ इंच होती. एकून १०४ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पूर नियत्रंण कक्षाचे समन्वय अधिकारी एस एम शिंदे यांनी दिली.