मुंबई : फ्लिपकार्ट कंपनीत ठेवलेले महागडे मोबाईल चोरून विकणाऱ्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयला मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलिसांनी अटक केली ( Flipkart delivery boy arrested ) आहे. याच पैशातून तो प्रेयसीसोबत मुंबईबाहेर जाऊन मौज मजा करायचा. मुंबई आणि गुजरातमधून आतापर्यंत 15 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
Flipkart Delivery Boy : प्रेयसीसोबत मौजमस्ती करण्यासाठी डिलिव्हरी बॉयची कंपनीतच चोरी - Flipkart delivery boy arrested
कंपनीत ठेवलेले महागडे मोबाईल चोरून विकणाऱ्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयला मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलिसांनी अटक केली ( Flipkart delivery boy arrested ) आहे. याच पैशातून तो प्रेयसीसोबत मुंबईबाहेर जाऊन मौज मजा करायचा.
![Flipkart Delivery Boy : प्रेयसीसोबत मौजमस्ती करण्यासाठी डिलिव्हरी बॉयची कंपनीतच चोरी Flipkart Delivery Boy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16896504-974-16896504-1668146332389.jpg)
साडे सहा लाखाचे मोबाईल जप्त : जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 6 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी फ्लिपकार्टचे व्यवस्थापक प्रणय धवल, अन्य साथीदार सागर राजगोर आणि भूषण गांगन यांना मुंबईतील विविध भागातून अटक ( Flipkart manager and three arrested ) केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक असे मोबाईल चोरुन अनेक दिवसांपासून मुंबई आणि गुजरातमध्ये विकायचे. फ्लिपकार्ट कंपनीच्या मॅनेजरने एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ( Flipkart company manager filed Complaint ) होती.
गुजरातमध्ये करायची विक्री :फ्लिपकार्ड कंपनीमध्ये मोबाईलची ऑर्डर रद्द केल्यानंतर मोबाईल परत कंपनीकडे यायचा. सातत्याने चोरी होत असून, आतापर्यंत डझनभर मोबाईल गायब झाले आहेत. तक्रार नोंदवल्यानंतर एमएचबी पोलिसांनी एक पथक तयार करून तपास सुरू केला. पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले ज्यामध्ये व्यवस्थापक चोरी करताना दिसले.तपासादरम्यान कंपनीचा मॅनेजर आणि डिलिव्हरी बॉय हेच मोबाईल चोरत असल्याचे निष्पन्न ( Flipkart delivery boy arrested stealing and selling mobile phones ) झाले.