मुंबई -मालाड मालवणी परिसरातील चारकोप नाक्यावरील वीर भगतसिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शाळेत खळबळ माजली आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील वीर भगतसिंग शाळेतील सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार हेही वाचा - राधानगरीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले, आत्महत्या नैराश्येतूनच
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलीला शाळेतील एका व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. पीडित मुलीने स्वतः हा प्रसंग पालकांना सांगितलेला असल्याचे पालक म्हणाले.
घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सध्या पीडित मुलीवर भक्तीपार्क रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या गोष्टीची कुणकुण इतर विद्यार्थ्यांच्या पालकांना लागताच शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घडलेला प्रकार शाळेकडून दाबला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम वृद्धास अटक