महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balveer Jiyansh Lamba : चिमुरड्याने केला 'ऑड अँड ईवन' नंबर बोलण्याचा रेकॉर्ड, इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - 100 पर्यंतचे ऑड अँड इव्हन नंबर केवळ 55 सेकंदात

मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारा सात वर्षीय जियांश लांबा या बालकाने आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच चकित केलं आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच १ ते १०० पर्यंत 'ऑड अँड इव्हन' (सम आणि विषम) संख्या जलद गतीने बोलण्याचा (Five year old boy records odd and even numbers) विक्रम केला आहे. २४ जुलै २०२१ ला त्याने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' चे पारितोषिक (India and Asia Book of Records) पटकावले आहे. Balveer Jiyansh Lamba

Balveer Jiyansh Lamba
जियांश लांबा

By

Published : Nov 11, 2022, 6:21 PM IST

मुंबई :मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारा सात वर्षीय जियांश लांबा या बालकाने आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच चकित केलं आहे. जियांशने अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी नामांकित अशा 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला' ला देखील नोंद घ्यायला लावली आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच १ ते १०० पर्यंत 'ऑड अँड इव्हन' ( सम आणि विषम) संख्या जलद गतीने बोलण्याचा (Five year old boy records odd and even numbers) विक्रम केला आहे. अगदी काही क्षणातच १ ते १०० पर्यंतचे ऑड अँड इवन नंबर बोलून दाखवतो. Balveer Jiyansh Lamba

प्रतिक्रिया देतांना जियांश लांबा व त्याचे कुटूंबिय

100 पर्यंतचे ऑड अँड इव्हन नंबर केवळ 55 सेकंदात न थांबता बोलून दाखवण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सोबतच एशिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील (India and Asia Book of Records) त्याची नोंद घेतली आहे. जीयांशचा जन्म १२ जानेवारी २०१६ ला झाला असून; २४ जुलै २०२१ ला त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे पारितोषिक मिळवले आहे. पारितोषिक मिळाले तेव्हा जीयांश चे वय अवघे ५ वर्ष ६ महिने एवढे होते.




जिहांशला लहानपणापासूनच आकड्यांशी खेळायला आवडत होतं. अगदी शाळेत जाण्याच्या आधीपासूनच गाड्यांचे नंबर, फोन नंबर, अगदी सहजपणे तो पाठ करत असल्याचे, वडील मनीष लांबा सांगतात. मात्र तो अगदीच लहान असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो. सहज आकडे त्याच्या लक्षात राहत असतील असं आम्हाला वाटलं. मात्र जसा जसा जीयांश मोठा होत गेला. तो गणित विषयाकडे जास्त आकर्षित होऊ लागला. आकडेमोड करणे, पाढे पाठ करणे अगदी सहजरीत्या त्याला जमायला लागलं. तसेच जिहांशची गणितातील रुची पाहून तो शिकत असलेल्या 'ग्रीन एकर ' शाळेतील शिक्षकांनी देखील खूप मदत केली असल्याचे जियांशची आई अनिता लांबा सांगतात.

जियांश ऑड अँड ईवन नंबरच्या स्पर्धेत भाग घेऊन, तो कधी रेकॉर्ड करेल असंही वाटलं नव्हतं. मात्र १ ते १०० पर्यंतचे आकडे बोलताना सहज रित्या तो ऑड अँड इवन नंबर देखील लक्षात ठेवू लागला. हे पाहून आम्ही त्याचा यासाठी सराव करून घेतला आणि त्याने अगदी ५५ सेकंदात ऑड अँड इवन नंबर पाठ केले, असल्याचं अनिता लांबा यांनी 'ई टिव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
जियांश आता सात वर्षाचा झाला आहे. मात्र त्याची बुद्धिमत्ता ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी आहे. नुकत्याच त्याच्या शाळेत पार पडलेल्या स्पर्धेत त्यांनी सर्व विषयात अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जियांश शाळेत अनेक स्पर्धेत भाग घेतो आणि सहज पाहिला क्रमांक पटकावतो.



तर 'गणित विषय हा आपल्या सर्वात आवडीचा विषय असल्याचं खुद्द जियांश सांगतो. आपल्याला आकड्यां सोबत खेळायला आवडते. गणित सोडवायला आवडते. एखादा नंबर आपण एकदा वाचला तर तो सहज आपल्या लक्षात राहतो. मात्र तरीही आपण सराव करत राहतो. ज्याने आपण अजूनही या विषयात पारंगत होऊ,' असे जियांशला वाटते. Balveer Jiyansh Lamba

ABOUT THE AUTHOR

...view details