महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balveer Mahi Kotpakar : पाच वर्षीय माहीने पाच मिनिटांत पाढे म्हणुन केला विक्रम, एक ते पंचवीस पर्यंतचे पाढे म्हणटले सलग

माही कोतपकर (Balveer Mahi Kotpakar) या पाच वर्षाच्या मुलीने पाच मिनिटात एक ते पंचवीस पर्यंतचे पाढे (set record for chanting in five minutes from one to twentyfive consecutive chants) म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) आपल्या विक्रमाची नोंद केली. जाणुन घेऊया एवढ्या लहान वयात तिला हे सगळं कसं शक्य झालं ते.

Balveer Mahi Kotpakar
माही कोतपकर

By

Published : Nov 9, 2022, 2:15 PM IST

मुंबई :माही कोतपकर (Balveer Mahi Kotpakar) पाच वर्षाची मुलगी. आई सारिका आणि माहीची मोठी बहीण अस्मि. या मोठ्या बहिणीमुळे माही हा विक्रम करू शकली. इंडिया (India Book of Records) बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (set record for chanting in five minutes from one to twentyfive consecutive chants) तिच्या विक्रमाची नोंद झाली. जाणून घेऊया डोंबिवलीच्या माही कोतपकर हिने कोणता आणि कसा केला हा विक्रम.

प्रतिक्रिया देतांना माही कोतपकर आणि तिचे कुटूंबिय




प्रयत्नांची पराकाष्ठा केली की लहान मुलांची कर्तबगारी आणि गुण हे समोर येऊ लागतात . ठाणे जिल्ह्यातील माही कोटपकर डोंबिवलीमध्ये राहणारी. माहीपेक्षा दोन वर्षांनी मोठी अस्मी क्लासला जायची आणि तिथून पाढे कसे नेमके लक्षात ठेवायचे, या संदर्भातली पद्धत ती शिकली. रोज ती घरी मोठ्याने पाढे म्हणायचे आणि ही तिची बहीण माही तिच्यासोबत बसायची. एकदा माहीने मोठ्या बहिणीला विचारलं ,'अस्मी दीदी तू काय करते? हे नेमकं मला सांगशील का? तर, तिच्या बहिणीने सांगितलं की,'मी हे पाढे पाठ करते आणि या पद्धतीने ते सोडवते.' बस तेवढेच कारण आणि माहीच्या मनात कुतुहल जागं झालं.


माहिने हे कुतूहल पुढे विकसित केल. म्हणजे तिच्या बहिणीला तिने भंडावून सोडलं की, मलापण शिकव मी पण हे तू जसं करते. तसं करणार. मग तिच्या दिदीने अस्मिने तिला पाढे पाठ करण्याचं तंत्र शिकवलं. म्हणजे ते प्रत्यक्ष संकल्पनेपर्यंत कसं जायचं याची आकडेमोड मोठ्या बहिणीने लहान बहिणीला शिकवलं.



यासंदर्भात पाच वर्षाच्या माहिला विचारले की हे रेकॉर्ड कसं केलं तर तिने ईटिव्ही सोबत बोलताना सांगितलं की,'माझी अस्मि दीदी रोज पाढे पाठ करायची म्हणजे पाढे सोडवायची. ते कसे सोडवायची ते मी पाहिलं आणि त्यातून शिकू लागली आणि मला माझ्या दीदीने ते बरोबर शिकवलं. त्यामुळे मी एक ते 25 पर्यंतचे पाढे पाच मिनिटात म्हटले.' 5 जून 2021 ला माहीने हा विक्रम केला.


माहीच्या आई सारिका यांच्यासोबत ईटीवी ने संवाद साधला असता त्यांनी म्हटलं की, 'काय झालं तिची मोठी बहीण अस्मि ही क्लासला जायची आणि घरी इथे अभ्यास करताना गणिताचा विषय घेतला की पाढे पाठ करणे आणि ते सोडवणं त्याबद्दलची जी पद्धती अस्मि शिकली. तर तो सराव पाहून पाहून माही शिकली आणि तिच्या कुतूहलाकडे मी लक्ष दिलं आणि तिच्या आजी-आजोबांनी पण तिला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ती या विक्रमापर्यंत पोहोचली.'

ABOUT THE AUTHOR

...view details