मुंबई -केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ डिसेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'भारत बचाओ महारॅली'चे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून या रॅलीसाठी पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांची गांधी भवन येथे भारत बचाओ महारॅलीच्या समन्वयकांसोबत बैठक संपन्न हेही वाचा... कांदा साठवणुकीचे नियम आणखी कडक; किरकोळ विक्रेत्यांकरता 'हा' नवा नियम लागू
भारत बचाओ महारॅलीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी दिलेल्या समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिसन ओझा, डॉ. गजानन देसाई, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.
हेही वाचा... हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांच्या किमती जानेवारीत २ हजार रुपयापर्यंत वाढणार
या बैठकीत रॅलीच्या तयारीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. राज्यातून जाणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वाहतूक व निवास व्यवस्थेची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना थोरात म्हणाले, की 'केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी असे सर्वच समाजघटक या सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय काँग्रसे कमिटीने आयोजित केलेल्या महारॅलीला देशभरातून लाखो काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. राज्यातूनही पाच हजार कार्यकर्ते दिल्ली येथे होणाऱ्या भारत बचाओ महारॅलीत सहभागी होणार आहेत.'
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग