महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत मृत्यूप्रकरणाची तपासणी करण्यासाठी सीबीआयच्या ५ टीम, घटनेचे करणार 'रिक्रिएशन'

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दिल्लीतून आलेले सीबीआयचे पथक मुंबईतील कलिना येथील कार्यालयात तपास करीत आहे. या प्रकरणी पहिल्या टप्प्यात तपास करण्यासाठी सीबीआयकडून ५ टीम बनविण्यात आल्या आहेत.

five-team-formed-to-investigate-sushant-singh-rajput-suicide-case
सुशांत प्रकरणी सीबीआयच्या ५ टीम करणार तपास - घटनेचे करणार रिक्रिएशन तर ५६ जणांचे जबाबही नोंदवणार

By

Published : Aug 21, 2020, 11:30 AM IST

मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दिल्लीतून आलेले सीबीआयचे पथक मुंबईतील कलिना येथील कार्यालयात तपास करीत आहे. याप्रकरणी पहिल्या टप्प्यात तपास करण्यासाठी सीबीआयकडून ५ टीम बनविण्यात आल्या आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिल्यानंतर काल एजन्सीचे विशेष तपास पथक काल मुंबईत दाखल झाले. या पथकाचे प्रमुख सीबीआय पोलीस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद आहेत. याप्रकरणी पहिल्या टप्प्यात तपास करण्यासाठी सीबीआयकडून ५ टीम बनविण्यात आल्या आहेत.

एक टीम सुशांतसिंहचे बँक खाते, कंपनीच्या आर्थिक व्यवहार संबंधी तपास करणार असून दुसरी टीम मुंबई पोलिसांशी तपास कामात समन्वय साधणार आहे. यासाठी मुंबई सीबीआय युनिटमधील एक वरिष्ठ अधिकारी हा नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आला असून मुंबई पोलिसांकडून हवी असलेली कागदत्र, पुरावे, सुशांतसिंहचा शवविच्छेदन अहवाल, बँक खात्यांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट याबद्दल हे अधिकारी समन्वय साधणार आहे.

दरम्यान, तिसरी टीम सुशांतच्या बांद्रा स्थित घरी जावून आत्महत्येच्या घटनेचे रिक्रिएशन करून तपास करणार आहे. चौथी टीम सुशांतसिंहच्या संपर्कातील असलेल्या व्यक्तींच्या चौकशी करणार आहे. तर, पाचवी टीम सुशांतसिंहच्या आत्महत्या संदर्भातील साक्षीदार तसेच मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविलेल्या ५६ व्यक्तींचा जबाब पुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details