मुंबई :मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणावर आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू होती. यापूर्वीचे आयुक्त श्रीनिवास यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर या पदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉक्टर संजय मुखर्जी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुखर्जी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1996 च्या तुकडीतील असून ते नागपूरचे आहेत.
एमएमआरडीए आयुक्तपदी डॉक्टर संजय मुखर्जी -सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनीषा म्हैसकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि राज्य शिष्टाचार विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. अनिल डिग्गीकर यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव पदी डॉक्टर के एच गोविंद राज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंदराज यांच्याकडे यापूर्वी एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त पदांची जबाबदारी होती. तर आता एमएमआरडीए च्या आयुक्त पदाची जबाबदारी डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याकडे देण्यात आली आहे.