मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १२ एप्रिल शेवटची तारीख होती. काल ५ उमेदवारांनी माघार घेतली असून त्यामुळे आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत एकूण ८६ उमेदवार आहेत. यानुसार आता मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून १८, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून २१, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून २७ व मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार असणार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात ५ उमेदवारांची माघार, निवडणुकीसाठी ८६ उमेदवार रिंगणात - mumbai upnagar
दि. २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही दिनांक १० एप्रिल रोजी करण्यात आली. या छाननीदरम्यान १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध, तर ९१ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात दि. २ एप्रिल रोजी प्रारंभ झाला होता, तर ९ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत संपुष्टात आली होती. दि. २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही दिनांक १० एप्रिल रोजी करण्यात आली. या छाननीदरम्यान १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध, तर ९१ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.
नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज १२ एप्रिल पर्यंत मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसापर्यंत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून राकेश विश्वनाथ अरोरा यांनी माघार घेतली आहे. मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून ज्योती सुरेश शेट्टी यांनी माघार घेतली आहे. मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र वामन वाघमारे यांनी माघार घेतली आहे. तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून राकेश अरोरा व मुइनुद्दीन यार मोहम्मद खान या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
वरीलनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातून एकूण ५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ’ करिता ८६ उमेदवार असणार आहेत.
दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था -
दिव्यांगांसाठी मतदानासाठी व्यवस्था विशेष करण्यात आली आहे. उपनगरात साडेचार हजार मतदार आहेत. या दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष वाहन व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिव्यांगांना विशेष टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
टोल फ्री क्रमांक - 8655235714, 9869515952, 02226510020