मुंबई- बनावट मेडिकल पदव्यांच्या आधारावर मुंबईतील भायखळा, नागपाडा सारख्या परिसरात दवाखाना उघडून पीडित रुग्णांना बनावट औषध देणाऱ्या 5 बोगस डॉक्टरना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून एकाच वेळी 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी पाच बोगस डॉक्टरांना अटक करीत त्यांच्याकडून बनावट मेडिकल पदवी, युनानी औषधे व इतर साहित्य जप्त केले आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 अटक आरोपीत एक बोगस डॉक्टर शमशेर कादिर शेख (वय - 36 वर्षे) हा आरोपी कधीही शाळेत गेलेला नाही. मात्र, भायखळ्यात तो गेली 8 वर्षे जनसेवक आयुर्वेदिक दवाखाना चालवत होता. या बरोबरच अन्वर अकबर हुसेन (वय - 45 वर्षे) हा शिक्षण 10 नापास आहे. नईम मोहमदीया शेख (वय - 40 वर्षे) हा 7 वी नापास, नवाब अजगर हुसेन (वय - 36 वर्षे) हा 12 वी नापास आहे तर रिवाउद्दीन फाईमुद्दीन बंजारा (वय- 35 वर्षे) हा 8 वी पर्यंत शिकलेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - नो मनी नो वोट..! पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा न्यायालयासमोर ठिय्या