मुंबई -येथील दहिसर रावळपाडा गावडेनगर परिसरातील ओम साईराज ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी दरोडा टाकला होत्या. यावेळी त्यांनी ज्वेलर्सच्या मालकाचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील पाचही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपींनी वापरलेला बुट हा मुख्य धागा बनला होता. असे मुंबई पोलीसचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
गुन्ह्यासाठी मध्यप्रदेशातून बोलवले होते -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर ज्वेलर्स हत्या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी दुकान मालकाची गोळी झाडून हत्या करुन दागिने घेऊन लंपास झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करुन या पाच आरोपींना अटक केली. यातली चिराग रावल आणि अंकित महाडिक या आरोपींनी हा सर्व कट रचला होता. तर आयुष्य पांडे, निखिल चांडाळ, उदय बाली या तीन आरोपी मध्यप्रदेश राज्यातून गुन्ह्यासाठी बोलवण्यात आले होते.
गुजरातमधून आरोपींना घेतले ताब्यात -