मुंबई- शहरातील चेंबूर परिसरात 4 सप्टेंबरला अनिकेत गुंजाळ या 23 वर्षीय युवकाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तपासाअंती ५ जणांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यावेळी जबरीने चोरी केलेली केटीएम कंपनीची दुचाकी हस्तगत केली आहे.
युवकाच्या हत्ये प्रकरणी पाच आरोपींना अटक, दुचाकी हस्तगत - चेबूर पोलीस क्राईम न्यूज
चेंबूरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ५ ही आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेशोत्सवात त्याची हत्या झाली होती.

अनिकेत गुंजाळ हा युवक ४ सप्टेंबरला ठाण्यातून त्याच्या मित्राच्या घरी गणपती उत्सवासाठी आलेला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या ५ ही आरोपींनी त्या रात्री दोन वाजता गुंजाळच्या मित्राच्या घरात घुसून अनिकेत गुंजाळवर तलवारीने वार केले. यात अनिकेत याचा जागीच मृत्यू झाला. तसेच आरोपींनी हत्येवेळी अनिकेतच्या खिशातील 10 हजार रुपयांची रक्कम, मोबाईल फोन आणि तो वापरत असलेली केटीएम मोटरसायकल चोरी केली. घटनेनंतर पाचही आरोपी फरार होते.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात असताना पोलिसांची काही पथके ही नाशिक, इगतपुरी, कर्जत, पुणे, सोलापूर, सातारा या ठिकाणी पाठवण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान सुरुवातीला पोलिसांनी उत्तम हिराचंद कडू (26) या आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या पुढील तपासामध्ये 10 सप्टेंबरला इतर आरोपी मुंबईत आले असून चेंबूर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी सनी सुरेश जगताप ( 26) भगवती चंडी शर्मा (29) निषात अशोक गुंजाळ (20) मनीष अशोक गुंजाळ (22) या चार आरोपींना चेंबूरमधून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेली केटीएम मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे.