मुंबई -वाढत्या पेट्रोल दरवाढीचा परिणाण समाजातील प्रत्येक घटकावर होत आहे. गरीब असो वा श्रीमंत किंवा नोकरदार असो वा व्यावसायिक सर्वच इंधन भाववाढीमुळे होरपळले आहेत. तीच कहाणी कोळी बांधवांची आहे. मुंबईत कोळीबांधव पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण मच्छिमारीसाठी डिझेलवर चालणाऱ्या बोटी हे मच्छिमार वापरतात. सध्या मच्छिमार बांधवांना 1 ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारी करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, इंधन दरवाढ अशी चालूच राहिली, तर मासेमारी करणे कठीण होईल, असे मच्छिमार बांधवाचे म्हणणे आहे. आधीच कोरोना व निसर्ग चक्रीवादळामुळे त्रस्त मच्छिमार बांधव आता इंधन दर वाढीमुळे चिंतेत आहे.
इंधन दरवाढ थांबली नाही, तर आमचे काय होणार? मच्छिमार बांधव चिंतेत - fule hike effect on fishing
कोरोनाच्या महामारीमुळे मच्छिमार बांधव उपासमारीला तोंड देत आहे. मग मच्छिमारांना उपेक्षित का ठेवले आहे? असा सवाल दामोदर तांडेल यांनी शासनाला विचारला आहे. महसूल व वन विभागाने १० जूनच्या परिपत्रकात मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याचा उल्लेख का केला नाही? असा सवाल तांडेल यांनी केला आहे.
3 जून २०२०ला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणातील जिल्ह्यांना बसला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने १० जून २०२०ला शासन निर्णय परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात १ ते ७ मुद्यात फक्त घरांचे झालेले नुकसान, झोपड्या, दुकानदार, टपरी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले आहे. या परिपत्रकात मच्छिमारांच्या नौकांचे, इंजिनचे, जाळ्यांचे, मासेमारी साहित्य व मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीचे नुकसान झालेले असताना त्याचा अजिबात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे मच्छिमार बांधवात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मच्छिमार बांधव उपासमारीला तोंड देत आहे. मग मच्छिमारांना उपेक्षित का ठेवले आहे? असा सवाल दामोदर तांडेल यांनी शासनाला विचारला आहे. महसूल व वन विभागाने १० जूनच्या परिपत्रकात मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याचा उल्लेख का केला नाही? असा सवाल तांडेल यांनी केला आहे. रायगडचे जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या निर्दशनास ही गोष्ट आणल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा करून या चक्रीवादळात मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचे वेगळे परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले आहे.