महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray Announcement : राज्याला देणार पहिली महिला मुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा - मनीषा कायंदे शिवसेनेच्या आमदारसुद्धा चर्चेत

राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री ( First Woman Chief Minister to Give The State ) देण्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray Made a Big Announcement ) आज केली. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामसाठी रणशिंग फुंकले आहे. आज महिला मुख्यमंत्री करण्याचा इरादा स्पष्ट केल्यानंतर महिला मुख्यमंत्री पदाची माळ ( Heated Discussion on Rashmi Thackeray Should be made CM ) कोणाच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Uddhav Thackeray Made a Big Announcement
उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

By

Published : Dec 1, 2022, 6:04 PM IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री ( Heated Discussion on Rashmi Thackeray Should be made CM ) करावे, अशी जोरदार चर्चा रंगली ( Uddhav Thackeray Made a Big Announcement ) होती. आता उद्धव ठाकरे यांनी थेट महिला मुख्यमंत्री करण्याचा इरादा ( First Woman Chief Minister to Give The State ) स्पष्ट केला आहे. शिवसेनेतील डझनभर महिला नेत्यांपैकी महिला मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामसाठी रणशिंग फुंकले :शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामसाठी रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेवरील दोन्ही गटांकडून केलेल्या दाव्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले. पक्षाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. हा अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असे ठणकावून सांगताना उद्धव ठाकरे आपण महिला मुख्यमंत्री देणार असल्याची घोषणा केली.

राज्याच्या इतिहासात महिला मुख्यमंत्र्याची घोषणा करणारे ठाकरे पहिले नेते :राज्यात आजवर महिला मुख्यमंत्र्यांची घोषणा करणारे, ठाकरे पहिले असतील. शिवसेनेत आधीच गळती लागली आहे. महिला गटातील अंतर्गत वाद समोर आले आहेत. त्यामुळे महिला मुख्यमंत्रीपदाची कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेतील काही महिलांची नावेदेखील यामुळे समोर आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर "या" रणरागिनी मांडतात भक्कमपणे पक्षाची बाजू :शिवसेनेतील फुटीनंतर सेनेतील अनेक रणरागिनी पुढे आल्या आहेत. उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे, खासदार प्रियंका चर्तुवेदी आदी महिला नेत्या नेहमीच आघाडीने शिवसेनेची बाजू मांडतात. मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या नेहमीच आघाडीवर असतात. त्यातच, सुषमा अंधारे यांच्यानिमित्ताने शिवसेनेला फायरब्रॅंड नवा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे महिला मुख्यमंत्रीपदाची धुरा उद्धव ठाकरे कोणाकडे देणार याची उत्सुकता वाढली आहे.

रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे यांची नावे आघाडीवर :महाविकास आघाडी सरकार काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याचा कारभार रश्मी ठाकरे हाकतात, असा आरोप केला जात होता. उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी भाजपकडून केली जात होती. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याबाबतही चर्चा रंगली होती. आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन आगामी निवडणुका लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर नक्की कोणाला संधी मिळणार, हा प्रश्न उपस्थि केला जात आहे. तर आजवर शिवसेनवर घराणेशाहीचे आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे त्यामुळे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेणार नाहीत, असे बोलले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details