महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डी.डी. सह्याद्रीवर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची भरणार शाळा - Gyanganga Educational Program

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून तासिकांचे प्रक्षेपण होणार आहे.

DD Sahyadri students classes
ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम

By

Published : Jun 13, 2021, 9:54 PM IST

मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून तासिकांचे प्रक्षेपण होणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

हेही वाचा -आजपासून मुंबईची बेस्टमधील एसटीची सेवा बंद - अनिल परब

दररोज चालणार पाच तास तासिका -

राज्यामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे विविध निर्बंध लागू केले आहेत. यामुळे राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दररोज आपल्या अभ्यास नियमितपणे करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी डी.डी सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण सकाळी ७ वाजून ३० ते दुपारी ३ वाजून ३० या वेळेमध्ये होणार आहे. डी.डी. सह्याद्री वाहिनीवर काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता हे प्रक्षेपण होणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

या चॅनलवर होणार तासिकांचे प्रक्षेपण -

डी.डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या डीडी फ्रेश डिश - ५२५, डिश टीव्ही - १२२९, व्हिडिओकॉन डी२एच - ७६९, टाटा स्काय - १२७४, हाथवे - ५१३ या चॅनेल क्रमांकावर विद्यार्थ्याना शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.

हेही वाचा -काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details