मुंबईWoman Captain In Navy: देशातील संरक्षण विभागातील तिन्ही दलामध्ये महिलांना देखील पुरुषांप्रमाणे संधी दिली जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही दलापैकी सर्वात प्रथम नौदलात महिलांना प्रथम संधी देण्यात आली. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आजवर युद्धनौकेचे नेतृत्व करण्याची संधी महिला अधिकारऱ्याला दिली नव्हती. मात्र आता महिलांना ती संधी दिली जाणार असल्याची माहिती दिलीय. याबाबत लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी (Prerna Deosthali) यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे.
कॅप्टन पदाचे दिले नियुक्त पत्र : नौदलातील पहिली महिला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कमांडर 'प्रेरणा देवस्थळी' यांचा पश्चिम नौदल कमांडरकडून गौरव करण्यात आलाय. नौदल कमांडच्या युद्ध नौका ताफ्याचे प्रमुख रियर ऍडमिरल सीआर प्रवीण नायर यांनी आयएनएस त्रिंकट युद्धनौकेच्या कॅप्टन पदाचे नियुक्तीपत्र लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी यांना दिलंय.
कोण आहे प्रेरणा देवस्थळी: आयएनएस त्रिंकट युद्धनौकेवर प्रेरणा देवस्थळी यांची महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर म्हणून नियुक्ती झालीय. यापूर्वी कॅप्टन देवस्थळी या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर तैनात होत्या. प्रेरणा देवस्थळी ह्या मुळच्या मुंबई येथील असून कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी, त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे. त्यांचा भाऊ देखील भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे नौदल अधिकार्यासोबत लग्न झाले असून त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. लेफ्टनंट सीडीआर प्रेरणा या TU -142 वरील पहिल्या महिला निरीक्षक आहेत. आयएनएस त्रिंकट हे एक युद्धनौका पश्चिम नौदल कमांडचा भाग आहे. आयएनएस त्रिंकट हे गस्त युद्धनौका आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून मच्छीमारांना संरक्षण दिलं जात आहे. घुसखोरी करणाऱ्या विरोधात कारवाई करणे शोध आणि बचाव मोहिमेत महत्वाची जबाबदारी पार पाडणे. या युद्धनौका 46 मीटर असून वजन 260 टन आहे. वेगाचा विचार केल्यास ताशी 56 किलोमीटर धावते. चार किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या 30 मिमी तोफने सज्ज आहे.
हेही वाचा -
- देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नौदलाला समर्पित
- KSHIPRA 2.0 व वीरांगना दालन, देशातील संरक्षण दलांच्या विभागाला पुरविणार आर्थिक सल्ला सेवा
- Video 76 वा पायदळ दिवस, राजनाथ सिंहने देशातील शूर सैनिकांना केले अभिवादन