मुंबई - देशात आपल्या खाकी कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस खात्याच्या या पहिल्या-वहिल्या साहित्य संमेलनाला दक्ष असे नाव देण्यात आले असून २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
खाकी वर्दीतील 'साहित्य' दर्दींसाठी मुंबईत भरणार पहिले साहित्य संमेलन
कामाच्या व्यापामुळे पोलिसांना नेहमीच ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्या साहित्यानिर्मितीला समाजासमोर मांडता आले पाहिजे. या हेतूने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसगलीकर यांच्याकडून या पोलीस साहित्य संमेलनाच्या आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील १७१ अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी यात भाग घेणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांच्यासह जेष्ठ साहित्यिक आणि हास्य कवी अशोक नायगावकर उपस्थित राहणार आहेत.
कामाच्या व्यापामुळे पोलिसांना नेहमीच ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्या साहित्यानिर्मितीला समाजासमोर मांडता आले पाहिजे. या हेतूने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पोलीस खात्यातील कर्मचारी ते वरिष्ठ आयपीएस अधिकारी सर्वच या संमलेनात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून कविता, चारोळ्या, साहित्य चर्चा पोलीस खात्यातील साहित्यिकांकडून ऐकायला मिळणार आहेत.