मुंबई -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ( IIT Mumbai ) येथे प्लेसमेंट सीझनचा पहिला टप्पा
1 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातच 300 कंपन्या ( 300 reputed companies will participate ) सहभागी होत आहेत. चांगल्या दर्जाचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळेल म्हणून विद्यार्थी देखील उत्सुक आहेत.
प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू-आयआयटी मुंबई येथे प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू झाला ( First Phase of IIT Mumbai Placement Begins ) असून तो 15 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. ज्यामध्ये 300 हून अधिक कंपन्या सहभागी होतील. आयआयटी संस्थेतील प्लेसमेंट मोहिमेला सुमारे 300 प्री-प्लेसमेंट ऑफरसह सकारात्मकतेने सुरुवात झाली आहे. आता पर्यन्त 300 तपैकी 194 ऑफर्स स्वीकारल्या गेल्या आहेत.
IIT Mumbai Placement : आयआयटी मुंबई येथे प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू - First Phase of IIT Mumbai Placement Begins
आयआयटी मुंबई ( IIT Mumbai ) येथे प्लेसमेंटचा पहिला टप्पा १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार ( placement at IIT Mumbai ) आहे. यात ३०० नामांकित कंपन्या सहभागी ( 300 reputed companies will participate ) होतील.
प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी IIT बॉम्बेमध्ये 46 कंपन्यांचा सहभाग -वैयक्तिकरित्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. पहिल्या दिवशी 250 जॉब ऑफरपैकी 175 हून अधिक ऑफर स्वीकारल्या गेल्या. पगाराची पॅकेजेस मोठ्या प्रमाणात अपरिवर्तित राहिली आहेत, तर टेक दिग्गज एकतर खूप निवडक आहेत किंवा या वर्षी कॅम्पसला भेट दिली नाही.
प्रतिष्ठित कंपन्या होणार सहभागी -आयटीचे प्रवक्त्यांनी भारत सोबत बातचीत करताना सांगितले की," आयटीच्या विद्यार्थ्यांची मुलाखतीनंतर काही कंपन्यांनी भरती केलेली आहे. त्या कंपन्या प्रतिष्ठित कंपन्या आहेत. यात Accenture सोल्युशन्स, एअरबस इंडिया, मायक्रोसॉफ्ट इंडिया, मॉर्गन स्टॅनले, मॅककिंसे, प्रॉक्टर अँड गॅम्बल, क्वालकॉम, शेल इंडिया, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, टाटा स्टील इ." कंपन्या सहभागी होणार आहेत.