मुंबई - मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेर्फे हा पहिला उमेदवारी अर्ज आहे.
मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल - Sivsena first Nomination
मागाठाणेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाल शेट्टी, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश सुर्वे
हेही वाचा - भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कट; 'या' नवीन चेहऱ्यांना संधी
ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीतून येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत सुर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाल शेट्टी, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. भाजप शिवसेनेते कोणताही वाद नाही. मागाठाणेचा विकास हाच ध्यास असल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.