महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा, नितीन देसाई यांची कलाकृती - साँफ्ट लँडिंग

ही कलाकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. 'चांद्रयान २' अवकाशात झेपावले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे, असे नितीन देसाई म्हणाले.

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा

By

Published : Aug 30, 2019, 11:53 PM IST

मुंबई- प्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला. यावर्षी लालबागचा राजा मंडळ कोणती कलाकृती साकारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख दर्शनाचा पडदा खुलताच एकच जल्लोष झाला. चंद्रयान 2 या मोहिमेच्या देखाव्याचे दर्शन यावेळी उपस्थितांना घडले.

ही कलाकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. 'चांद्रयान २' अवकाशात झेपावले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे, असे नितीन देसाई म्हणाले. चांद्रयान २ चा लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबरला पहाटे चांद्रभूमीवर साँफ्ट लँडिंग करेल. हे भारताचे मोठं यश असेल, म्हणूनच याबाबत देखावा साकारण्याची कल्पना सुचल्याचे देसाई यांनी म्हटले. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा

ABOUT THE AUTHOR

...view details