मुंबई- विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. एमआयएम पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज मराठी पत्रकार संघात आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली यात ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा-विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!
आपने आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरीसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरुडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वती मतदारसंघातून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे, असे आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत मेमन शर्मा, धनंजय शिंदे, किशोर मध्यान, कुसुमाकर, रुबेन असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी-
(1) पारोमिता गोस्वामी -बह्मपुरी, चंदपूर जिल्हा
(2) विट्टल गोविंद लाड -जोगेश्वरी विधानसभा, मुंबई
(3) डॉ. आनंद गुरव -करवीर, कोल्हापूर
(4) विशाल वडगुळे -नांदगाव विधानसभा, नाशिक
(5) डॉ. अभिजित मोरे -कोथरूड, पुणे
(6) सिराज खान -चांदिवली, मुंबई
(7) दिलीप तावडे -दिंडोशी, मुंबई
(8) संदीप सोनावणे -पर्वती, पुणे