महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Transgender Ward : राज्यात प्रथमच तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी 'या' रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड - तृतीयपंथी स्वतंत्र वॉर्ड मुंबई

राज्यात तृतीयपंथीयांसाठी मुंबईतील जी टी रुग्णालयात ( GT Hospital in Mumbai ) पहिल्यांदाच स्वतंत्र वॉर्ड ( First independent ward for transgender ) तयार करण्यात येणार आहे. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात अशा पद्धतींचा तृतीयपंथीयांसाठी हा पहिलाच स्वतंत्र वॉर्ड असणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या वॉर्डची ( Transgender Ward ) सुरुवात करण्यात येणार असल्याचे जी टी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. भालचंद्र चिखलकर यांनी सांगितले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 20, 2022, 7:38 PM IST

जी टी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. भालचंद्र चिखलकर माहिती देताना

मुंबई : अनेकदा सार्वजनिक रुग्णालयात तृतीयपंथी ( Transgender ) जेव्हा उपचारासाठी जातात तेव्हा त्यांच्याकडे इतर रुग्णांप्रमाणे बघणे अपेक्षित असताना अनेकदा त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते. तशा तक्रारी देखील बऱ्याचदा समोर आल्या आहेत. या सर्व अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड ( First independent ward for transgender ) तयार करण्याचे ठरले असून मुंबईतील गोकुळदास तेजपाल रूग्णालयात ( Transgender Ward in GT Hospital in Mumbai ) नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा वॉर्ड कार्यरत होणार आहे.

रुग्णसेवेसाठी मार्गदर्शन : जी टी रुग्णालयात ( GT Hospital in Mumbai ) काम करणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थश्रेणी कामगार यांना याबाबत आता विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हमसफर ट्रस्टच्या माजी संचालिका आणि मानसशास्त्रज्ञ हेमांगी म्हाप्रळकर यांना आमंत्रित केले गेले आहे. त्या गेल्या २२ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून तृतीयपंथीयांना कशा प्रकारे रुग्णसेवा द्यावी याविषयी त्या मार्गदर्शन करत आहेत. तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड झाल्याने आम्हाला आता इतर जाचाला बळी पडावे लागणार नाही अशी अपेक्षा रेखा दमरे या तृतीयपंथीने व्यक्त केली आहे. तसेच अशा पद्धतीचे वॉर्ड प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत अशी अपेक्षाही दमरे यांनी व्यक्त केली.

२५ बेडचा विशेष वॉर्ड :तृतीयपंथींच्या या विशेष वॉर्ड विषयी बोलताना जी टी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे तृतीयपंथींचा वॉर्ड ( Transgender Ward at GT Hospital in Mumbai ) तयार करण्याचे काम सुरू आहे. २० ते २५ बेडचा हा विशेष वॉर्ड असणार आहे. त्याबाबत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण व त्यासाठी जनजागृती यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तृतीयपंथीयांना इतर रुग्णांप्रमाणे आरोग्यसेवा पुरविली जाईल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. आमचे कर्मचारी, डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेतील याकडे लक्ष देण्यात आले आहे. या विशेष वॉर्डसाठी जास्त मेहनत घेण्यात आली आहे. तसेच विशेष नियमावली बनविण्यात आली असून याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना याबाबत माहितीही देण्यात आली असल्याचेही अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details