मुंबई - ड्रग्ज तस्करी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केलेले चार तस्कर आणि फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नी शबाना सईद यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी एनसीबीने या 5 जणांना अटक केली होती. फिरोज नाडियादवालाही एनसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले होते.
ड्रग्ज तस्करी प्रकरण : फिरोज नाडियादवालाही एनसीबी कार्यालयात दाखल
फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नी शबाना सईद आणि ड्रग्ज तस्करी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या ४ जणांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर रोजी एनसीबीने या 5 जणांना अटक केली होती. तसेच फिरोज नाडियादवालाही एनसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले होते.
ड्रग्ज तस्कर प्रकरण
7-8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून, एनसीबी अनेक ड्रग पेडलर्सच्या घरी छापा टाकत होती. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 5 ड्रग पेडलर्सना ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान निर्मात्याचे नाव समोर आले. शनिवारी सायंकाळी एनसीबीने नवी मुंबई आणि मुंबईच्या विविध भागात छापा टाकला, तेथून एजन्सीकडून गांजा आणि एमडी व्यावसायिक प्रमाणात सापडला.
Last Updated : Nov 9, 2020, 1:25 PM IST