मुंबई- गोवंडी भागात आज (सोमवार) सकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाला असून यात अब्बास शेख आणि तौकिर गोरी हे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्याना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपत्तीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबईत संपत्तीच्या वादातून पहाटे गोळीबार; दोन जखमी - गोळीबार
अब्बास शेख आणि तौकिर गोरी हे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्याना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवंडी बैगणवाडी सिग्नलजवळ असलेल्या आशा हॉलसमोर हा गोळीबार करण्यात आला. देवनार येथील लल्लू भाई कंपाउंडमधील रहिवाशी अजगर हलवरी यांचा काही लोकांबरोबर संपत्तीचा वाद सुरू आहे. आज पहाटे 3. 40 ते 5.30 दरम्यान त्यांचा मुलगा सुलतान हा आपल्या मुलांबरोबर आशा हॉलजवळ आला होता. त्यावेळेस चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या देखील झाडल्या. यावेळी सुलतानला वाचवताना त्याचा मित्र अब्बासच्या पायाला गोळी लागली, तर तौकरच्या हाताला दुखापत झाली आहे.
या हल्लेखोरांपैकी एकाला जागेवरच पकडण्यात आले असून इतर हल्लेखोर पळून गेले आहेत. याप्रकरणी देवनार पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.