महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्ल्यात कुख्यात गुंडावर गोळीबार - कुख्यात

गजबजलेल्या कुर्ला पश्चिम येथील हलाव पूल येथे गोळीबाराची घटना घडली. कुर्ल्यातील पोलीस रेकॉर्डवर असलेला कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या आहेत.

Mumbai

By

Published : Mar 5, 2019, 12:14 PM IST

Updated : Mar 5, 2019, 1:47 PM IST

मुंबई- गजबजलेल्या कुर्ला पश्चिम येथील हलाव पूल येथे गोळीबाराची घटना घडली. कुर्ल्यातील पोलीस रेकॉर्डवर असलेला कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली.

या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बिल्लाला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जाणू पवार उर्फ बिल्ला याच्यावर कुर्ला पोलीस ठाणे विनोभा भावे नगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. जाणू पवार हा नुकताच एका खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असावा, अशी प्राथमिक माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Last Updated : Mar 5, 2019, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details