मुंबई- नहार साकीनाका सोसायटीतील पापीलियो पार्क येथे कौटुंबीक वादातून एकाने गोळीबार केला. या गोळीबारमध्ये एक 60 वर्षीय वयोवृध्द जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याना मृत घोषित केले. इब्न हसन खान, असे मृताचे नाव आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
कौटुंबीक वादातून नहार साकीनाका सोसायटीत गोळीबार; एकाचा मृत्यू - firing
नहार साकीनाका सोसायटीतील पापीलियो पार्क येथे कौटुंबीक वादातून एकाने गोळीबार केला. या गोळीबारमध्ये एक 60 वर्षीय वयोवृध्द जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याना मृत घोषित केले.
तपास करताना पोलीस
इमामुदीन शुकरूला खान वय 60 वर्षे (रा. नहार सोसायटी) यांनी आपले व्याही इब्न हसन खान (वय 60 वर्षे) यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. इमामुदीन यांची मुलगी इब्न हसन खान यांच्या मुलाला दिली आहे. त्यांच्यामध्ये घटस्फोटासाठी वाद सुरू असल्याने हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. आरोपी इमामुदीन याने गोळी झाडून स्वतः साकीनाका पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.