मुंबई- नागपाडा, कामाठी पुरा येथील चायना इमारतीला आज सकाळी आग लागली. आगीच्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल दाखल झाले असून 8 जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
मुंबई : कामाठीपुऱ्यातील चायना इमारतीला आग, 8 गंभीर जखमी - fire in kagpada
कामाठीपुरा येथील चायना इमारतीला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपाडा, कामाठी पुरा येथील शुक्ला इस्टेट जवळील बगदादी कम्पाउंड येथील चायना इमारतीला आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 बंब आणि 3 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीची दाहकता वाढल्याने आणखी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांना पाचारण करण्यात आले आहे. इमारतीतून 8 जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढून जवळच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चांदणी शेख (वय 25 वर्षे), निशा देवी (वय 32 वर्षे), चंदा देवी (वय 60 वर्षे), आदिल कुरेशी (वय 20 वर्षे), आनीया (वय 2 वर्षे), रंजना देवी (वय 24 वर्षे), संजना देवी (वय 30 वर्षे), मोहनराम (वय 70 वर्षे), अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.