Fire In Dagadi Chal : डॉन अरुण गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत आग - दगडी चाळीत आग लागल्याची घटना
भायखळा येथे गँगस्टर अरुण गवळी राहत असलेल्या दगडी चाळमधील एका घराला आग लागल्याची घटना आज बुधवार (दि. ११ जानेवारी)रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. येथे अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून आग विजवण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.
![Fire In Dagadi Chal : डॉन अरुण गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत आग दगडी चाळीत आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17461228-680-17461228-1673457705756.jpg)
मुंबई : येथील दोन मजली इमारतीमधील दुसऱ्या माळ्यावरील घरात आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. २१.२१ ची ही घटना आहे. आगीने मोठा पेट घेतला असल्याने आग विजवण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, मुंबई अग्निशमन दल, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, बेस्टचे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले आहेत. अद्याप कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. यानंतर आग अग्निशमन दलाशी संपर्क साधला असता त्यांनी आग नियंत्रणात आली असून, योमध्ये कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती दिली आहे.