महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पायधुणीमधील सुपर शॉपिंग सेंटरला आग; जीवितहानी टळली - एसी

दक्षिण मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील सुपर मार्केटमधील शॅापिंग सेंटरला अचानक आग लागली. क्षणात ही आग भडकल्याने नागरिकांची धावपळ उडाली. चार मजली कमर्शिअल असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या मजल्यावर इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य, स्टेशनरी, कपडे, रॅा मटेरियल, गारमेंट आदी साहित्य असल्याने आग अधिकच भडकली.

प्रतिकात्मक फोटो

By

Published : Apr 22, 2019, 6:16 PM IST

मुंबई- पायधुनी येथील अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील शॅापिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाने शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

मागील काही दिवस मुंबईत आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोमवारी दक्षिण मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील सुपर मार्केटमधील शॅापिंग सेंटरला अचानक आग लागली. क्षणात ही आग भडकल्याने नागरिकांची धावपळ उडाली. चार मजली कमर्शिअल असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या मजल्यावर इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य, स्टेशनरी, कपडे, रॅा मटेरियल, गारमेंट आदी साहित्य असल्याने आग अधिकच भडकली.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. वरच्या मजल्यावर अडकलेल्या काहींना शिडीच्या सहाय्याने तत्काळ बाहेर काढण्यास दलाला यश आले. त्यानंतर दलाने शर्तीचे प्रयत्न करून तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शॅापिंग सेंटरमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप समजू शकली नसून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय -

मी जेव्हा सकाळी दुकानात आलो पूजा करत असताना बाजूच्या गाळ्यातून धूर येत होता. एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी. आम्ही दुकाने बंद करून खाली आलो. आत कोणी अडकले नाही. आग लागल्याने सर्व घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर आले, अशी माहिती येथील व्यापारी नितीन शहा यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details